Ajit Pawar | अजित पवारांनी पत्रकारांना खडसावले, म्हणाले- ‘हे असले धंदे बंद करा! महागाई, बेकारीवर बोला’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून (Andheri By-Election) माघार घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप जर माघार घेत असेल, तर ही स्वागतार्ह गोष्ट आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

मागील काही काळात कोल्हापूर आणि पंढरपूरमध्ये पोटनिवडणुका झाल्या. यावेळी भाजपने आपला उमेदवार दिला होता. पण आता वातावरण वेगळे आहे. तसेच ऋतुजा लटके या निवडणुकीच्या तयारीला लागल्या आहेत. त्यामुळे भाजपचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे पवार (Ajit Pawar) म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन केले होते, असे देखील पवार म्हणाले.

 

यावेळी पवारांनी पत्रकारांना एका प्रश्नावर खडसावले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आम्ही मशाल विझवणार आहोत आणि घड्याळ बंद पाडणार आहोत, असे म्हटले होते.
त्यावर आपली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न अजित पवारांना पत्रकाराने विचारला. त्यावर ते म्हणाले, कोणी काही म्हंटले तरी तसे होणार आहे का, तुम्हा पत्रकारांना काय सवय लागलीय, बावनकुळे असे म्हणाले, त्यावर तुमचे काय मत आहे.
त्यानंतर मी काहीतरी म्हणालो, की त्यांना विचारायचे ते असे म्हणाले, आता तुमचे काय मत आहे, हे असले धंदे बंद करा.
त्यापेक्षा महागाई, बेकारी यांच्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर बोला.

अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसनाची पाहणी केली.
शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. केवळ त्यांच्यासाठी घोषणा केल्या गेल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
पवार अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar scolded the journalists, said- ‘Stop these businesses! Talk about inflation, unemployment’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’

Chandrakant Patil | ‘आम्ही माघार घेतली नसती, तर…’, चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना सुनावलं

Devendra Fadnavis | ‘काहींनी प्रत्यक्ष विनंती केली, तर काहींनी…’, विरोधकांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर