Ajit Pawar | ‘सरकारला सत्तेची मस्ती आली आहे…’ अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात अतिशय खालच्या पातळीचे राजकारण सुरू असून त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. असा घणाघात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधारी भाजप-शिंदे सरकारवर केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी आरवडे येथे आयोजीत सभेत बोलताना अजित पवार यांनी विद्यमान सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

यावेळी आयोजीत सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘सरकारचं काय चाल्लंय? आम्ही आर. आर अनेक वर्षे सत्तेमध्ये होतो, पण आम्ही असं कधी चुकीचे वागलो नाही. राज्यातील सरकारला (State Government) सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायदाला तिलांजली दिली आहे, कंर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडले. हे सर्व ५० खोके सरकार ओके. खालच्या पातळीवरचे राजकारण सुरु आहे, त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल.’ असे अजित पवार म्हणाले.

 

तसेच, यावर पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘राज्याच्या मंत्री मंडळात एक पण महिला नाही, तुमच्या पोटात दुखतं का? महिलांना का घेत नाही? विस्तार पण करत नाही. राज्यात अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. मंत्रिमंडळ पण वाढवत नाही, सगळ्यांनी मंत्री करतो म्हणून गाजर दाखवले. मात्र, सत्ताधाऱ्यांना भीती वाटत आहे का मंत्रिमंडळ विस्तार करण्याची? अशी विचारणा अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना केली.

या सरकारचं काय चाल्लंय, छत्रपती यांच्याबद्दल बेताल बोलतात. आम्ही कसं खपवून घ्यायचे? शाहू, फुले आणि कर्मवीर यांच्याबद्दलही बोलतात. सरकारचे आमदार, मंत्री देखील बोलत आहेत. त्यांना लाज लज्जा शरम आहे का नाही? छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराजरक्षक संबोधून मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा चालू आहे, असा आरोप देखील यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्ताधारी भाजप-शिंदे सरकारवर केला.

 

यावेळी बोलताना अजित पवारांनी केंद्राच्या साखर निर्यात धोरणावर (Central Government Export Policy) देखील सडकून टीका केली.
ते म्हणाले, ‘केवळ कोटा पद्धत धोरण घेऊन उत्तर प्रदेशच्या फायदा केला.
आम्ही ओरडून सांगतोय, पण कोणी ऐकत नाही. महाराष्ट्रात प्रचंड साखर शिल्लक असून निर्यातीचा कोटा वाढवला,
तर राज्याच्या शेतकऱ्यांना 600 रूपये अधिकचा दर मिळेल, पण आमच्या शेतकऱ्यांच्या हातात देवळातील घंटा देण्यात येत आहे.’ असा घणाघात त्यांनी केंद्राच्या निर्यात धोरणावर केला.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar sharp attack on the shinde fadnavis government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना