Ajit Pawar | अजित पवारांनी राज्यात खरेदी-विक्री झालेल्या साखर कारखान्यांची यादीच दाखवली वाचून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | जरंडेश्वर कारखान्यात घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे (BJP) जेष्ट नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. हा आरोप त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केला होता. या आरोपानंतर राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या. या आरोपानंतर आता अजित पवार यांनी महाराष्ट्रात किती साखर कारखान्यांची खरेदी विक्री झाली याची लिस्टच वाचुन दाखवली आहे. त्यावेळी पवार हे आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, कोणी उठवल 25 हजार कोटी भ्रष्टाचार झाला,
अनेक चौकश्या झाल्या यात काहीच मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर, जरंडेश्वर बाबत सतत माझ्या कुटूंबाचा उल्लेख केला गेला जात आहे.
मला लोकांना सांगायच की मुबंई हाय कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (Jarandeshwar Cooperative Sugar Factories) थकलेले पैसे न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला.
जरडेश्वर साखर कारखाना विकत घेण्यासाठी अनेक निविदा आल्या होत्या,
या कारखान्यात कुठलाही गैरव्यवहार झाला नाही. असं हाय कोर्ट आणि सुप्रिम कोर्टाने म्हटलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यात आतापर्यंत 64 साखर कारखान्यांची खरेदी किंवा विक्री झाल्याची त्यांनी यादी समोर वाचली आहे.
त्यावेळी अजित पवार म्हणाले की, जिल्हा बँकांनी राज्यातील वेगवेगळ्या सहा कारखाने विकले तर राज्य बँकेने तीस कारखाने विकल्याचे त्यांनी सांगितले आहे.
तसेच, 6 सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकानी विकले.
6 सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले.
3 सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले.
12 सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चावण्यास देण्यात आले आहेत.
अशी महिती पवार यांनी दिली आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar showed the list of sugar factories bought and sold in the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात भरदिवसा बेछुट गोळीबार; वाळू व्यावसायिक संतोष जगतापसह दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक (व्हिडीओ)

Multibagger Stock | ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना दिला ‘विक्रमी’ रिटर्न, 1 लाखाचे झाले 12 लाख रुपये, जाणून घ्या पुढे कशी असेल वाटचाल?

Petrol Diesel Price Today | देशात पहिल्यांदा पेट्रोल पोहचले 120 रुपये लीटरवर; List मध्ये जाणून घ्या कोणत्या शहरात आहे सर्वात महाग इंधन