Ajit Pawar | “दारू पिता का? असं आपण विचारत नाही…”; अजित पवारांनी सत्तारांना सुनावले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) आमदार जितेंद्र आव्हाड प्रकरण (Jitendra Awhad), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, ओला दुष्काळ आणि हर हर महादेव चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आदी मुद्दे चर्चिले.

त्यावेळी बोलताना अजित पवारांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना चांगलेच फैलावर घेतले. अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी ‘चहा कमी पितो,’ असं म्हटलं. त्यावर अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला.

जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा सुरु असल्याचं पाहून सत्तार काहीसे गोंधळले. त्यांनी मोबाईलचा कॅमेरा बंद करण्यास सांगितला. मात्र, सत्तार यांचा “दारू पिता का?” हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. तर, या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रियाही येत आहेत. गेल्या एकही दिवसांपासून सरकारमधील अनेक नेते त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या या नेत्यांच्या वक्तव्यामुळे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. अजित पवार यांनी मुंबईत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (devendra Fadanvis) भेट घेऊन या बद्दल चर्च केल्याची माहिती दिली. भाजपात (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena Shinde Group) वाचाळवीरांची प्रस्थ वाढत असल्याची म्हणून त्यांच्ये कान टोचले आहेत.

या वक्तव्यावर अब्दुल सत्तारांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मी सहजच तसं बोललो. मात्र यावर अजित पवारांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे, “हे असं चालत नाही. ते सहज बोलायला नागरिक नाही. ते राज्याचे प्रतिनिधी आहेत, ते मंत्री आहेत, त्यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्यावर जबाबदारी आहे,” असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

पवार पुढे म्हणाले “तुम्ही दारू पिता का? असं आपण विचारत नाही”. “लोक ऐकून घेतात, पाहतात आणि
लक्षात ठेवत असतात. हे दुरुस्त केलं पाहिजे. काहीजण सहज बोलून जातात, ते सर्वांनी पाहिलं.
आपण बोलताना कोणाला चहा पाहिजे असेल तर चहा घ्या, पाणी पाहिजे असेल तर पाणी घ्या,
कॉफी पाहिजे असेल तर कॉफी घ्या. कोणी काहीच घेत नसेल तर दुध घ्या. तुम्ही दारू पिता का?
असं आपण विचारत नाही. मात्र, मंत्र्यांची असं बोलण्यापर्यंत मजल गेली आहे,” असं मत अजित पवार यांनी
व्यक्त केलं.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar slam abdul sattar over alcohol remark with collector

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update