Ajit Pawar | अजित पवारांच्या प्रश्नाने मुख्यमंत्री सापडले कैचीत, ‘तो प्रकल्प आमच्याच काळात गेला होता, तर तुम्ही पुन्हा…’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | देशात आणि राज्यातही भाजपाचे सरकार (BJP Government) आहे, तरीही राज्यात येणारे मोठ-मोठे प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातला जात आहेत. यावरून राज्यातील तरूणांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या संतापाची दखल घेऊन खुद्द पंतप्रधानांना आश्वासन द्यावे लागले. असे असतानाही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) प्रकल्प गेल्याचे खापर विरोधकांवर फोडण्याची राजकीय खेळी करत आहेत. यावरून आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सवाल करत कैचीत पकडले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या मंथन शिबिरात जाण्यापूर्वी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

 

अजित पवार यांनी म्हटले की, वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn Project) आणि टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. जर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्याच (Maha Vikas Aghadi Government) काळात गुजरातमध्ये होणार, हे निश्चित झाले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सरकार आल्यावर या प्रकल्पासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक का घेतली?

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, देशाच्या प्रमुखपदी असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रात अनेक प्रकल्प येणार आहेत, हे का सांगावे लागते? तसेच केंद्र आणि राज्य सरकारला नोकर्‍यांची नियुक्तीपत्रे देण्यासाठी स्वतंत्रपणे का कार्यक्रम घ्यावा लागतो?

राज्यात 75 हजार सरकारी नोकर्‍या देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले, कोणत्याही सरकारच्या काळात कृषी, पोलीस किंवा अन्य विभागांमध्ये गरज पडेल तशी लहान-सहान भरती सुरुच असते. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचे अपयश झाकण्यासाठी राज्यात 75 हजार सरकारी पदांची भरती करण्याची घोषणा केली.

 

ते पुढे म्हणाले, वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस यासारखे खासगी प्रकल्प हे राज्याबाहेर गेले.
हे प्रकल्प महाराष्ट्रात आले असते तर एक ते दीड लाख रोजगार निर्माण झाले असते.
या सगळ्यामुळे राज्यातील तरुणांच्या मनात रोष उत्पन्न होताना दिसत आहे.
याचा त्यांना पुढील निवडणुकीत फटका बसू शकतो, याची जाणीव सरकारला आहे.
त्यामुळेच आता पंतप्रधान आणि राज्य सरकारला नोकर्‍यांची नियुक्तीपत्रे देण्यासारखे कार्यक्रम हाती घ्यावे लागतात.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar slams shinde fadnavis govt and pm narendra modi over jobs and projects in maharashtra news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | सुषमा आंधारेंच्या टीकेला नवनीत राणांचे प्रत्युत्तर, ‘कुणाला आळशी माणूस बघायचा असेल, तर ‘मातोश्री’वर…’

Deepika Padukone | आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिकाने शेअर केली ‘ती’ पोस्ट, सगळीकडे होत आहे चर्चा

Kartiki Ekadashi | औरंगाबादचे दाम्पत्य ठरले महापूजेचे मानकरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापूजा