Ajit Pawar | जनतेनं निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी ?, PM मोदींच्या टीकेवरुन अजित पवारांचा सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बहुमताने अस्तित्वात आणलेले हे सरकार आहे. जनतेने निवडून दिले असेल तर घराणेशाही (Dynasticism) कशी ? लोकशाहीत घराणेशाही आणू नये, भ्रष्टाचाराचं (Corruption) समर्थन कोणीही करु नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या घराणेशाहीच्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिलं. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबई-राष्ट्रवादी कार्यालयात (NCP) ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात आले. त्यावेळी अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले, जनतेने निवडून दिलं असेल तर घराणेशाही कशी ? लोकशाहीत घराणेशाही कोणीही आणू शकत नाही. यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru), इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या कारकिर्दीची आठवण करुन दिली. लोकांना त्यांच काम आवडलं तर ते निवडून देतात. ज्यांच्यात कुवत नाही, ताकद नाही, नेतृत्व नाही, त्यांना जर तुम्ही पदावर बसवलं तर त्याला घराणेशाही कसं म्हणू शकतात. जर पुढची पिढी कर्तुत्ववान असेल त्याला मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

पंतप्रधान मोदींनी राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गुणवत्तेवर अन्याय होत असल्याने घराणेशाहीचा तिरस्कार करणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, मी ज्यावेळी काका – पुतण्याशाही, घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना मी फक्त राजकीय क्षेत्राबद्दल बोलतोय असं वाटतं. दुर्दैवाने राजकारणातील या घराणेशाहीची लागण देशातील इतर संस्थांमध्ये झाली असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. राजकारणाच्या बाहेरील घराणेशाहीमुळे देशातील गुणवत्तेचे नुकसान झाले आहे.

 

Web Title : –  Ajit Pawar | ajit pawar statement about nepotism should not be introduced in democracy maharashtra political marathi news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा