Ajit Pawar | कोरोना वाढला तर कोण जबाबदार? जनआशीर्वाद यात्रेवरून अजित पवारांचा केंद्राला सवाल (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Ajit Pawar | कोरोना (corona) चे रूग्ण पुन्हा एकदा वाढू लागल्याने राज्यासह केंद्राची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला (Ajay Bhalla) यांनी योग्य ती खबरदारी घेण्यासाठी सर्व राज्यांना पत्र पाठवून निर्देश दिले आहेत. या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. केंद्रावर निशाणा साधत पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, एकीकडे पत्र पाठवून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देता आणि दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा (Janashirwad Yatra) काढून लोकांची गर्दी जमवता. या यात्रेच्या ठिकाणी कोरोनाचा फटका बसला तर कोण जबाबदार?

देशातील काही राज्यात कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागल्याने केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी ज्या जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचा दर अधिक आहे त्यांना तातडीने पावले योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सणासुदीच्या काळात गर्दी होणार नाही, ही गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करावी, असे निर्देश दिले आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

गृह सचिवांच्या पत्रावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राच्या दुटप्पी वर्तनावर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, राज्यांना खबरदारीचा सल्ला देता, आणि दुसरीकडे नवीन 4 केंद्रीय मंत्र्यांना कसल्या यात्रा काढायला सांगतात. आगामी काही दिवसांतच या यात्रेच्या ठिकाणी कोरोनाचा फटका बसलेला दिसेल. उद्या याठिकाणी रुग्ण वाढले तर याला कोण जबाबदार?

अजित पवार पुढे म्हणाले, केंद्राने केंद्राचे काम केले आहे, आपण आपले काम करायचे.
त्यांना काळजी वाटली म्हणून त्यांनी पत्र पाठवले.
आपणही नियम पाळले पाहिजेत, गर्दी टाळली पाहिजे.

यावेळी पवारांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, जोपर्यंत रिपोर्ट मिळत नाही.
तोपर्यंत मी यावर बोलणार नाही, अशाप्रकारच्या अनेक चौकशा होत असतात. त्यावेळी सर्वजण चौकशीसाठी मदत करत असतात.
त्यामुळे सध्या यावर काहीही बोलणार नाही.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar statement on janashirvad yatra in maharashtra on rising corona cases