Ajit Pawar | शिंदे-फडणवीस सरकारवर अजित पवारांचा जोरदार निशाणा; म्हणाले – ‘पन्नास लोकांचे सरकार अधिकार्‍यांच्या बदल्यात दंग’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमी आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) जोरदार निशाणा साधला आहे. पन्नास लोकांचे सरकार राज्यातील विकासकामाचा आराखडा बनवायचे सोडून अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात जास्त दंग झाले आहे अशी टीका त्यांनी केली. माणमध्ये तात्यांनंतर गलिच्छ राजकारण सुरू झाले. माणमधील काहीजण अगोदर अपक्ष, नंतर काँग्रेस (Congress), मग भाजप (BJP) असे करत आहेत. मात्र, राजकारणात असे चालत नाही, असा टोला विधान सभेचे विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी आ. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना नाव न घेता लगावला आहे. माण येथील माजी आमदार स्वार्गीय सदाशिवराव पोळ (Sadashivarao Pol) तात्या यांच्या स्मरणार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

 

अजितदादा पुढे म्हणाले, मंत्रालयात गेल्यानंतर मला कर्मचारी सांगतात की दादा पन्नास लोकांचे सरकार फक्त आमच्या बदल्या कारण्यात व्यस्त झाले आहे. मर्जितले अधिकारी आपापल्या भागात आणण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत असून दादा हे कुठेतरी थांबवा, अशी विनंती अधिकारी करत आहेत. माणमध्ये देखील खालच्या थराचे राजकारण सुरु आहे. तात्यांच्या काळात असे कधीच झाले नाही. काहीजण अपक्ष निवडून येतात. पुन्हा काँग्रेसमध्ये जातात तिथे निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये जातात, आता पुन्हा कुठे जाणार माहिती नाही, असे चालत नाही. त्यामुळे येत्या लोकसभेला माढा मतदार संघातून (Madha Constituency) पवारसाहेबांच्या विचाराचा खासदार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अधिकार्‍यांनो कोणाच्या दबावाला बळी पडून काम करून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. कार्यकर्ता चुकला तर जरूर कारवाई पण नाहक त्रास देऊ नका, असा दमसुद्धा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला.

गद्दारांचा घेतला समाचार
अजितदादांनी (Ajit Pawar) आपल्या भाषणात गद्दारांचा चांगलाच समाचार घेतला. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी खुशाल उघड जावा. माझ्यापर्यंत तक्रारी येतेच, त्यामधील काहीजण आजही खाली बसलेत व काहीजण स्टेजवर सुद्धा बसलेत. यावेळी निष्ठावंत चारच राहिले तरी चालतील मात्र गद्दारांची फौज घेऊन कधीच राजकारण करता येत नाही.

 

राजकारण करणार्‍यांना करू दे, आपण काम करू…
अजितदादा पवार मुंबई-बंगलूर कॉरिडॉर (Mumbai-Bangalore Corridor) संदर्भात बोलताना म्हणाले,
दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली.
त्या बैठकीमध्ये हा प्रकल्प माणदेशात मंजूर करावा, असे आदेश देण्यात आले होते.
त्यासंदर्भाचे पत्र अजितदादांनी भरसभेत वाचून दाखवले. मात्र आजही हा प्रकल्प मूळ जागेवरच होईल त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असणार आहे.
ज्यांना याचे राजकारण करायचे आहे त्यांना खुशाल करू द्या आपण काम करू असे अजितदादा यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar takes strong aim at Shinde-Fadnavis government; Said – ‘Fifty people riot in exchange of government officials’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Skin Disease | ‘मोदींनी नायजेरियातून आलेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अजिब आणि हास्यास्पद दावा

Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर