Ajit Pawar | ‘शिंदे साहेबांच्यावर बोललं तरी हीच भू…भू…भू.. करतंय’, अजित पवारांची शिवसेना नेत्यावर विखारी टीका

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिवसेना नेते (Shiv Sena Leader) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. कराड चिपळून रस्त्याचं किती वर्ष काम चालू आहे. काय करतोय इथला आमदार? असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

 

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, सारखं जरा काही झालं की टीव्हीच्या पुढे सगळा मक्ता यालाच दिलाय. शिंदे साहेबांच्यावर बोललं तरी हीच भू…भू…भू.. कुणावरही झालं की ह्यांनीच बोलायचं, माणसाने सत्ता आली की सत्तेची नशा मस्ती चढू द्यायची नसते. सत्ता येत असते सत्ता जात असते जमिनीवर पाय ठेऊन काम करायचं असतं. अशी टीका अजित पवारांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली.

 

पाटण बाजार समितीच्या निवडणुकीनंतर (Patan Bazaar Committee Election) शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर (Vikram Singh Patankar) यांच्या वाड्यासमोर शड्डू ठोकला होता. यावरुनही अजित पवार यांनी टोला लगावला. शड्डू ठोकून विकासकामं होत नाहीत, आपली तब्येत काय, आपण करतोय काय? असं म्हणत अजित पवारांनी शंभूराज देसाई यांची खिल्ली उडवली.

यावेळी अजित पवार यांनी शंभूराज देसाई आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यात झालेल्या वादाचा समाचार घेतला.
सदाभाऊ खोत यांनी शंभुराज देसाईंवर टीका केली. सत्तेची भांग प्यायल्यावर माणूस अंगात आल्यासारखा डुलायला आणि नाचायला लागतो,
असा टोला खोत यांनी शंभूराज देसाईंना लगावला होता. त्यावर शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर देताना,
सदाभाऊ खोतच भांग पित असतील, म्हणून त्यांन नशेत असं वक्तव्य केलं असेल असा पलटवार देसाई यांनी केला.

 

 

Web Title :  Ajit Pawar | ajit pawar targets shambhuraj desai over constant statements

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा