
Ajit Pawar | अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावेळी गैरहजर का?, अजित पवार म्हणाले -‘मी त्यांना…’
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) हे शनिवारी (दि.23) मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. परंतु, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी गैरहजर राहण्याचे कारण सांगितलं. अजित पवार (Ajit Pawar) आज (रविवार) पिंपरी चिंचवड दौऱ्यावर (Pimpri Chinchwad Tour) असून ते चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार म्हणाले, मी काल 23 सप्टेंबरला बारामतीत होतो. मी जसा 24 सप्टेंबरला दिवसभर पिंपरी चिंचवडला वेळ दिली आहे, 25 सप्टेंबरला दिवसभर पुण्याला वेळ दिली, तशीच 23 सप्टेंबरला बारामतीला वेळ दिली होती. मी वर्षानुवर्षे बारामतीचं नेतृत्व करतो आहे. बारामतीच्या पाच संस्था, सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी संघ, बारामती दुध संघ, बारामती बाजार समिती या सगळ्या संस्थांची वार्षिक बैठक असते.
या बैठका मला चुकवायच्या नव्हत्या. या बैठकीची तारीख ठरवून 15 दिवस आधी अजेंडा काढला जातो.
त्यामुळे मी अमित शाहांच्या कार्यालयाला हे कळवलं होतं की, अमित शहांचा दौरा असला, तरी तिथे मी नाही.
माझा दौरा ठरला आहे, अशी माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली.
अजित पवार पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही
कानावर ही गोष्ट घातली होती. मी बारामतीमध्ये होतो आणि संध्याकाळी शहरातील काही गणेश मंडळांच्या भेटी
आणि इतर कार्य़क्रम होते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत माझं काम सुरु होतं. असंही त्यांनी सांगितलं.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | सुनील शेळकेंचे ‘ते’ आरोप हस्यास्पद, मला टार्गेट करण्याची रणनिती;
रोहित पवारांचा अजित पवार गटावर निशाणा