Ajit Pawar | अजित पवारांनी आमदार रोहित पवारांना सुनावले, म्हणाले-‘अरे शाहण्या तु…’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, जामखेडला काल गेलो होतो. मात्र तिकडे कोणीही मास्क (Mask) वापरत नसल्याचे पाहायला मिळाले. मी रोहितला म्हटलं, अरे शाहण्या तु आमदार आहेस (You are MLA). तु मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत हे बरोबर नाही, अशा शब्दात अजित पवारांनी (Ajit Pawar) रोहित पवारांना सुनावले.

बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील एका पतसंस्थेच्या उद्घाटन कर्याक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. ते म्हणाले, कोरोना गेलेला नाही काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तिसरी लाट (Corona third wave) आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. लसीकरण (Vaccination) करुन घ्या. टोकाची भूमिका घेयला लावू नका. लसीकरण वाढवण्यासाठी उपक्रम राबवा. लसीकरण झाल्यावर जरी कोरोना झाला तरी माणसाचे प्राण वाचतात, असे पवार म्हणाले.

कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली. परंतु कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली.
परिणामी नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे बक्षिस देता आले नाही.
मात्र, आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Web Titel : Ajit Pawar | ajit pawar told MLA rohit pawar you are mla if you use mask i can tell others

हे देखील वाचा

World Diabetes Day 2021 | डायबिटीजमध्ये ‘हे’ 8 हेल्दी पदार्थसुद्धा शरीरावर करतात उलटा परिणाम, जाणून घ्या आणि दूर ठेवा

Milind Teltumbde | पोलिसांच्या चकमकीत माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार? जाणून घ्या तेलतुंबडेचं ‘रेकॉर्ड’

Nana Patole | दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे षडयंत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा थेट आरोप

SBI ATM | एसबीआयच्या एटीएममधून डेबिट कार्ड नसेल तरी काढू शकता पैसे, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा