Ajit Pawar | अजित पवारांनी केलं महिलांचं कौतुक ! महिला पायलटचा ‘तो’ किस्सा सांगितला…(व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Ajit Pawar | पुणे जिल्हा परिषदेकडून अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. महिला आपल्या कामात प्रामाणिक असतात. ते प्रत्येक काम प्रामाणिकपणासह चोखपणे पार पाडतात, अशा शब्दात त्यांनी महिलांचं कौतुक केलं आहे. त्यावेळी अजित पवार यांनी आपल्यासोबत घडलेला महिला पायलटचा (Woman Pilot) एक किस्सा सांगितला आहे.

 

महिलांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘आपल्या हेलिकॉप्टरमध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता.
तो बिघाड त्या महिला पायलटने थेट आवाजावरुन हेरला होता, असं त्यांनी सांगितलं. तसेच, महिला आपल्या कामात प्रॉम्ट असतात.
माझ्या हेलिकॉप्टरच्या आवाजात थोडासा फरक जाणवताच महिला पायलटने लगेच खाली उतरुन दुरुस्त केली.
तिथंच जर एखादा गडी असता तर माहित नाही काय झालं असतं, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.

आदर्श पुरस्कार मिळणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविकांचे हार्दिक अभिनंदन ! महिला बाल कल्याण विभागातर्फे 45 अंगणवाडी सेविकांना हा पुरस्कार दिला जातोय.
पुरस्काराने तुमच्या कामाचा हुरुप वाढतोय, इतरांनाही या कार्यक्रमातून प्रेरणा मिळेल. इतरांनाही पुढच्यावेळी हा पुरस्कार मिळावा, असं काम करा.
तर पुरस्कार मिळालेल्यांनीही लगेच आता झालं म्हणून निवांत होऊ नका. यापुढेही चांगलं काम करत राहा.
अंगणवाडी सेविकांनी कोरोना योद्धा म्हणून मोठं योगदान दिलं, याची शासनाने नोंद घेतली आहे.
सुरुवातीला अंगणवाडी सेविकांना तुटपुंजे मानधन मिळायचे. तरीही त्या काम करत राहिल्या. असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

दरम्यान, पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘शासनाचा कारभार लोकाभिमुख होण्यात तळागाळातील कर्मचाऱ्यांचा हातभार खूप महत्वाचा असतो.
कोरोनाचा काळ कसा गेला तो सर्वांनी पाहिलंय. आताही नवा व्हेरियंटचा धोका संभवत आहे. म्हणूनच अंगणवाडी सेविकांनी मास्क वापरासाठी पुढाकार घ्यावा.
महिला आरक्षणाचा निर्णय राबवताना त्यावेळी कार्यकर्त्यांनी खूप आढेवेळे घेतले होते पण चित्र बदललेय.
काहीजण स्वत:ला सेवक म्हणून घेतात पण प्रत्यक्षात मात्र तसं वागत नाहीत. महिलांचं मात्र तसं नसतं. त्या प्रामाणिकपणे काम करत राहतात.

 

Web Title : Ajit Pawar | ajit pawar told the story of a female pilotin pune ZP program

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maratha Reservation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख

Jiomart Groceries Orders On Whatsapp | आता WhatsApp वरुन मागवता येणार किराणा सामान, जाणून घ्या

Solapur Crime | धक्कादायक! मोहोळ तालुक्यातील नवोदय विद्यालयात 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नातेवाईकांचा रास्ता रोको