×
Homeताज्या बातम्याAjit Pawar | 'कोण अल्टिमेटम दोतो... आताच सांगतो, कुणीपण असू द्या...', अजित...

Ajit Pawar | ‘कोण अल्टिमेटम दोतो… आताच सांगतो, कुणीपण असू द्या…’, अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या (Azaan Loudspeakers) मुद्यावरुन 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या याच मुद्यावरुन मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना कडक इशारा दिला आहे. यावेळी अजित पवार यांनी राज ठाकरे याच्या आतापर्यंतच्या विविध भूमिकांवरुनही निशाणा साधला. अजित पवारांच्या (Ajit Pawar) इशाऱ्या मनसे कशाप्रकारे उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

 

मी आताच सांगतो…

अजित पवार (Ajit Pawar)  म्हणाले, कोण अल्टिमेटम (Ultimatum) देतो. मी आताच सांगतो, कोणी पण असू द्या. कायदा मोडला तर गय करणार नाही, आताच सांगतो. कुणीतरी महिने, वर्ष झाले की जाग येते, सभा झाली नाही. अरे बाब टोलचं आंदोलन (Agitation) घेऊन काय झालं पुढे? बांधकाम करणाऱ्या युपी-बिहारीच्या लोकांना चलेजाव म्हणाले, काय झालं पुढे? वातावरण खराब करुन रोजीरोटी सुटते का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. आता आयोध्येला (Ayodhya) यायचं तर भाजपच्या (BJP) एका नेत्याने माफी मागायला सांगितली. मला काय करायचं जाऊदे, असं अजित पवार म्हणाले.

 

शिर्डी, पंढरपूरची आरती बंद झाली, काय मिळालं?

शिर्डीची काकड (Shirdi) आरती, पंढरपूरची (Pandharpur) आरती बंद झाली, काय मिळालं? काहीतरी अल्टिमेटम देतोय. 3 तारखेनंतर बघा, अरे काय बघा? मला सांगायला काय जातंय राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांना इकडे जा तिकडे जा हे फोडा ते फोडा, माझं सांगायला काय जातंय? खटले तुमच्यावर होतील. उद्या मी जरी काही वेगळवाकडं सांगितलं तर तुम्ही नाही म्हणून सांगितले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

 

एसटी संपातून काय मिळालं?

एसटी संपाबाबत (ST Workers Strike) बोलताना अजित पवार म्हणाले, एसटी संपातून काय मिळालं? तुमचं नुकसान झालं, एसटीचं नुकसान झालं. प्रत्येक महिन्याला तिनशे कोटी रुपये खर्च यायचा. तो राज्यानेच उचलला ना? कारण नसताना वातावरण खराब करायचं, हे थांबवलं पाहिजे अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावलं.

Web Title :- Ajit Pawar | ajit-pawar warns mns chief raj thackeray over mosque loud speaker sound


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Police | पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित; जाणून घ्या प्रकरण

OBC Reservation Maharashtra | निवडणुकीपूर्वी आरक्षण मिळण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू

MP Bhavana Gawali | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी ED च्या चौकशीला पुन्हा गैरहजर

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News