Ajit Pawar | ‘…आणि तिथेच खरी गफलत झाली’, शिवसेनेतील बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

0
430
Ajit Pawar | ajit pawars big secret explosion regarding rebellion in shivsena
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनची शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) अशा दोन गटात विभागणी झाली. शिवसेनेतील अनेक आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार अल्पमतात आले. उद्धव ठकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) युती करुन सरकार स्थापन केले. आता यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौप्यस्फोट केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

… आणि तिथेच खरी गफलत झाली

शिवसेनेत जी फूट पडली आहे ती फूट पडण्यापूर्वीच या सर्व गोष्टींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती. स्वत: शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या होत्या. मात्र पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिथेच खरी गफलत झाल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.

हा आमच्या पक्षातील अंतर्गत मामला

अजित पवार पुढे म्हणाले, मी स्वत: यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना सावध केलं होतं. मात्र त्यावेळी ते बलले की, हा आमच्या पक्षातील अंतर्गत मामला आहे. मी बोलेल एकनाथ शिंदे यांच्यासोबत, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं आणि अखेर जे व्हायला नको होते तेच झालं. शिवसेनेत फूट पडली.

आता काँग्रेसने ताणून धरू नये

यावेळी अजित पवार यांना सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आले.
त्यावर बोलताना ते म्हणाले, सत्यजीत यांना उमेदवारी द्या असं स्वत: पवार साहेबांनी मल्लिकार्जुन खर्गे
(Mallikarjun Kharge) यांना फोन करुन सांगितलं होतं. मात्र त्यांनी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली
आणि तिथंच गडबड झाली. आता काँग्रेसने (Congress) ताणून धरु नये, आणि सत्यजित यांना पुन्हा सोबत
घ्यावं असा सल्ला अजित पवार यांनी काँग्रेसला दिला.
पण अंतिम निर्णय हा सत्यजितच घेतील असेही अजित पवार यांनी म्हटलं.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawars big secret explosion regarding rebellion in shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police API Suspended | पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

Chitrashi Rawat | ‘चक दे इंडिया’ फेम चित्राशी रावतनी 11 वर्षे डेटींगनंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

K Viswanath Passes Away | ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ विजेते तेलगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन