Ajit Pawar | पुणे लोकसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Ajit Pawar | Ajit Pawar's big statement regarding Pune Lok Sabha by-election being uncontested; said…
File Photo
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शुक्रवारी नियोजित कार्यक्रमांचा दौरा रद्द करुन नॉट रिचेबल (Not Reachable) झाले होते. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्क वितर्कांनाही उधाण आले होते. मात्र आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळपासून नियोजित दौऱ्याला सुरुवात केली. पुण्यातील खराडी परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानाचे उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नॉट रिचेबल राहण्याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या (Pune Lok Sabha by-Election) संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मोठं विधान केलं.

 

पुणे लोकसभेची निवडणूक घेण्याची गरज आहे की नाही यावर भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिलेत. वेगवेगळ्या अशा निवडणुका होत असतात आणि याबाबत निवडणूक आयोग (Election Commission) निर्णय घेईल. निवडणूक जाहीर करेल तेव्हा वेगवेगळे पक्ष त्यांची भूमिका सांगतील. आता निवडणूक आयोगाने काहीच घोषणा केली नाही, त्यामुळे आधीच काही बोलता येणार नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुलाखतीबाबत अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, पावर साहेबांची मुलाखत पाहिली, शेवटी पवारसाहेब आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही बोलू शकत नाही. तीच आमच्या पक्षाची भूमिका आहे.

 

माध्यमांनी बदनामी करणं थांबवावे

नॉट रिचेबल राहण्याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, मी माणूस आहे
आणि क्रार्यक्रमाला निघताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. जागरण जास्त झालं.
दौरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो. हे काही आजचं नाही, तर याआधीही असं झालं आहे.
त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेतल्या आणि शांत झोपलो. आज सकाळपासून कार्यक्रमला सुरुवात केली आहे.
माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे व्यथित झालो आहे. माध्यमांनी विनाकारण बदनामी करणं थांबवावे,
कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही लिमिट असते.
खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

 

 

 

Web Title :  Ajit Pawar | Ajit Pawar’s big statement regarding Pune Lok Sabha by-election being uncontested; said…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts