मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे भंडाऱ्या नंतर नागपूरमध्ये ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स लावण्यात आले आहे. यावर स्वत: पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीला अवधी असला तरी मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ महत्त्वाचे असले तरी कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची घाई झाली आहे. त्यामुळे ते नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावत आहेत. तसेच यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेच्या (Assembly Elections) जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं.
पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अशा प्रकारे फ्लेक्स लावण्यात आला. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि आता नाना पटोले यांचे फ्लेक्स शहरात लावले आहेत. अद्याप निवडणुकीला वेळ आहे, त्यामुळे अशा प्रकरारचे फलक कार्यकर्त्यांनी लावू नयेत, असे पटोले म्हणाले. तर अजित पवार यांनी यावर बोलताना, मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळ हवे असा टोला लगावला.
विधानसभेच्या जागा वाटपाबाबत म्हणाले…
अजित पवार यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत मोठं विधान केलं आहे. वरिष्ट नेत्यांनी लोकसभेत जावं असा काही निर्णय झालेला नाही.
आम्ही सध्या अंदाज घेत आहोत. सध्या आमचं लोकसभा निवडणुकीकडे (Lok Sabha Elections) लक्ष आहे.
जो लोकसभा निवडणुकीत चांगले काम करेल अशाच लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार केला जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Web Title : Ajit Pawar | Ajit Pawar’s big statement regarding the distribution of assembly tickets, said
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर केला लैंगिक अत्याचार; दुसर्या मुलीबरोबर केला ‘झेंगाट’
- Majhi Vasundhara Abhiyan News | Pune : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी
- Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : टेम्पोचालकावर कोयत्याने वार करुन लुटले; बाजारात जात असताना वाटेत साडेपाच लाख रुपये लुबाडले