Ajit Pawar | लाॅकडाऊनबाबत अजित पवारांची अधिवेशनादरम्यान महत्वाची माहिती; नियमाबाबत आमदारांचेही टोचलं कान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | महाराष्ट्रात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सध्या नागपूर ऐवजी मुंबईत सुरु आहे. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांत अनेक मुद्यावरुन गदारोळ माजला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात महत्वाच्या विषयावर लक्ष घातले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या आणि त्याचे पडसाद जगभरात उमटलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron variant) पार्श्वभुमीवर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन (Lockdown) बाबत देखील त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

 

‘अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सभागृहाला लक्षात आणू देऊ इच्छितो कालपासून आपलं अधिवेशन सुरू झालंय. आपण इथे बसलेले लोकप्रतिनिधी 3-4 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. स्वत: देशाचे पंतप्रधानही जे कोरानाचे संकट आहे त्याबाबत गांभिर्याने विचार करत आहेत. ज्यामध्ये रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर, देशपातळीवर चाललीय. परंतु, इथे काही ठराविकजण सोडले तर अजिबात इथे कोणी मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथे काय चाललंय ते बघतो आहे. जर आम्हीच कुणी मास्क लावले नसेल तर ते कसे. मी मास्क लावून बोलतो, काहींना अडचण असेल तर त्यांनी बोलण्यापुरता मास्क काढावे. पण त्यानंतर पुन्हा मास्क लावू शकतो.’ असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘परदेशातील परिस्थिती इथल्या अनेकांना माहित नाही.
दीड दिवसाला दुप्पट पेशंटची संख्या वाढतेय. WHO परदेशात पाच लाख लोकं मृत्युमुखी पडतील असे सांगितले आहे.
आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे काय. काही-काही गोष्टी ज्या त्यावेळीच त्याचे गांभीर्य लक्षात घेतल्या पाहिजे.
मास्क लावले नसेल तर त्यांना बाहेर काढा. मी मास्क लावले नसेल तर मलाही बाहेर काढा. पण या गोष्टीचे गांभिर्य पाळा.
विरोधीपक्ष आणि सर्वांनाच माझी विनंती आहे की, आपण बाहेर बघतो व्हिडीओ, बातम्या लगेच चॅनेलवर जातात.
आता नविन विषाणूचे नविन रुप पुढे आलेय. तेव्हा गांभिर्य ठेवा अशी विनंती.’ असं अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar’s important information about lockdown during the maharashtra winter assembly session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level | ‘ब्लड शुगर’च्या उपचारासाठी परिणामकारक ठरू शकते उंटीणीचे दूध, जाणून घ्या इतर फायदे

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात विमानाने यायचे आणि चोरी करुन परत जायचे, गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या