Ajit Pawar | ‘कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कोयना धरणाच्या (Koyna Dam) वर्धापनदिनी (16 मे 2022) प्रातिनिधिक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना (Koyna Dam Project Victims) जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला आहे. कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. 1 मे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे.

 

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, ”महाराष्ट्राच्या विकासात कोयना धरणाचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. कोयना धरणासाठी बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यांच्या पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. प्रकल्पग्रस्तांच्या संकलन यादीच्या अद्ययावतीकरणाचे काम बहुतांशपणे पूर्ण झाले आहे. या पात्र प्रकल्पग्रस्तांना सांगली (Sangli), सोलापूर (Solapur), सातारा (Satara), रायगड (Raigad) जिल्ह्यातील जमीन वाटपाची प्रक्रिया 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून सुरु करावी.” असे निर्देश त्यांनी दिले.

पुढे अजित पवार म्हणाले, ”पात्र प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप प्रक्रिया सुरु करण्यासाठी प्रमाणिक संचालन पध्दती (SOP) तयार करुन उपलब्ध जमिनीची यादी आणि प्रक्रियेसाठी भरावयाचा अर्ज प्रसिध्द करण्यात यावा. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे जमिनीचे वाटप करण्यात यावे. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या ‘ITI’ प्रमाणपत्रधारक पाल्यांना ‘महावितरणमध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना,” देखील अजित पवार यांनी दिल्या आहेत.

 

दरम्यान, मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) (व्हिसीद्वारे), वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane), श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर (Dr. Bharat Patankar), कार्याध्यक्ष संपत देसाई (Sampat Desai) आदी मान्यवरांसह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawars instructions to resolve pending issues of koyna dam project victims

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा