Ajit Pawar | ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने 500 कोटी निधी वितरित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी (500 crores) रुपयांचा निॆधी वितरीत करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा (ST staff) पगार आणि अन्य आवश्यक बाबीसांठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या अर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटी ला आधीच वितरित केला असून बाकी 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, याबाबत आदेश अजित पवारांनी (Ajit Pawar) दिले आहेत. अजित पवार यांच्या आदेशावरुन एसटी महामंडळाला (ST Corporation) तातडीने हा निधी वितरित केला आहे. या निर्देशावरुन निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आणि तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेत एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. या पार्श्वभुमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती कार्य करित आहे.

दरम्यान, या समितीच्या झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत
उपाययोजनांवर चर्चा केली आहे. यावरुन पुढील काळात कार्यवाही करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी 500 कोटी रुपये वितरित करण्याचे निर्देश दिले व त्यानुसार तातडीने निधी वितरित करण्यात आला.

हे देखील वाचा

Maharashtra Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

Pune Crime | खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्याकडून गोळीबार, घरामध्ये केला चोरीचा प्रयत्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ajit Pawar | ajit pawars order immediate rs 500 crore msrtc employees salaries

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update