Ajit Pawar | खडसे, मुंडे यांच्यात काय चर्चा झाली?, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले- ‘खडसे आणि मुंडे यांनी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) या नाराज असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांनी अनेकवेळा त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) आणि पंकजा मुंडे यांची बंद दाराआड अर्धातास चर्चा झाली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

खडसे आणि मुंडे यांच्या भेटीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, पंकजा मुंडे यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर बोलनं योग्य होणार नाही. मुंडे आणि खडसे यांनी अनेक वर्ष एकाच पक्षात काम केलं आहे. खडसे मुंडेसाहेबांना (Gopinath Munde) मानतात असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

ही कौटुंबीक भेट होती – खडसे

पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, पंकजा मुंडे आणि आपली कौटूंबिक भेट आहे. याचा राजकारणाशी काही संबंध नाही. मात्र पंकजा मुंडे यांची सध्या भाजपामध्ये झालेली स्थिती पाहून आपल्याला वेदना होत असल्याचे खडसे म्हणाले. ते पुढे म्हणाले, भाजपाने संधीसाधू लोकांना जवळ केले आणि माझ्या सारख्यांना व पंकजा मुंडे यांना दूर केले आहे, अशी खदखद खडसे यांनी व्यक्त केली.

 

म्हणून नाथाभाऊ भेटीला आले – पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या, तीन जून हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी आज कोणत्याही राजकीय नेत्याला इथे निमंत्रीत केले नाही.
मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या निष्पाप लोकांनी हा कार्यक्रम ठेवला आहे. नाथाभाऊ यांचं मुंडेसाहेबांवर प्रेम आहे.
म्हणून नाथाभाऊ भेटीसाठी आले. ते कोरोना काळात येऊ शकले नव्हते. ते मुंडेसाहेबांचे सहकारी होते, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

 

 

Web Title :  Ajit Pawar | ajit pawars reaction on the meeting of pankaja munde eknath khadse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा