Ajit Pawar | ‘अजित पवारांकडून जिवाला धोका’, भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले -‘माझ्याकडून धोका असू शकतो, पण…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार भाजपचे (BJP) पदाधिकारी रवींद्र साळगावकर (Ravindra Salgaonkar) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) दिली आहे. साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, होय, माझ्याकडून त्यांना धोका असू शकतो. पण तो राजकीय धोका (Maharashtra Politics News) असू शकतो. पण शारीरिक धोका असू शकत नाही, असे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी कायदा व सुव्यवस्था (Law and Order) आणि संविधान (Constitution) पाळणारा माणूस आहे. माझ्याकडून धोका असण्याच काहीच कारण नाही, माझ्याकडून राजकीय धोका असू शकतो, पण शारीरिक धोका नाही. पुण्यात माझ्याविरोधात ज्यानं तक्रार दिली त्याला पोलिसांनी (Pune Police) आणि सरकारने संरक्षण द्यावं, असेही अजित पवार यांनी म्हटलं.

यावेळी अजित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी काही ना काही वक्तव्य करतात. कारण नसताना महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) अंतर पडू शकते. काँग्रेसचे काही अंतर्गत प्रश्न आहेत. ज्याने त्याने पक्षाचे अंतर्गत प्रश्न सोडवावे. आम्हाला वाटतं आघाडी टीकावी. टाळी एक हाताने वाजत नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात येतात, असं म्हणत अजित पवारांनी नाना पटोलेंच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीवर बोलताना अजित पवार म्हणाले, त्या दोघांमध्ये बरेच दिवस झाले भेट झाली नव्हती.
त्यामुळेच संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे भेटायला आले होते.
त्यांच्यात तास-दीड तास चर्चा झाली.
महाविकास आघाडीच्या संदर्भात किंवा गेल्या काही काळात प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य झाली होती.
त्यासंदर्भात चर्चा झाली असावी. याबाबत योग्य तपशील माहित नाही.
1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबईतील सभेबाबतही चर्चा झाली असावी, असे अजित पवार यांनी सांगितले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawars reaction regarding mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

Maharashtra Politics News | ‘अजित पवार भाजप बरोबर जाणार…तेही लवकरच’, अंजली दमानियांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

Ajit Pawar | अजित पवारांना ईडीकडून दिलासा! ‘त्या’ प्रकरणात अजित पवारांसह सुनेत्रा पवारांचे नाव आरोपपत्रातून वगळले