सत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच ‘एकत्र’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. यामुळे देशभर खळबळ उडाली होती. 80 तासांच्या या राजकीय नाट्यानंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अवघ्या साडेतीन दिवसांत कोसळले.

या घटनेला आता बरेच दिवस उलटून गेले आहेत. यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर होते. हे दोन्ही नेते आज एका ठिकाणी एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये 20 मिनीटे चर्चा झाली. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून अजित पवार हे अजूनही भाजप सोबत जाण्याचा विचार करत नाहीत ना ? अशी चर्चा सुरु झाली आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाचे आज लग्न होते. या लग्नाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावळी या दोघांमध्ये चर्चा सुरु असल्याचे पहायला मिळाले. त्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. संजय शिंदे हे अजित पवारांच्या जवळचे आहेत. त्यामुळे अजित पवार या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित होते. तर देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असल्याने त्यांना शिंदे यांनी आमंत्रित केले होते. दोघांचीही लग्नात भेट झाली.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 20 मिनीटे चांगल्या गप्पा रंगल्याचे पहायला मिळाले. त्यावेळी सगळेच नेते त्यांच्या गप्पांकडे कुतूहलाने बघत होते. वीस मिनीटे गप्पानंतर अजित पवार हे जेवण करून पुण्याकडे रवाना झाले तर देवेंद्र फडणवीस मुंबईकडे प्रस्थान केले.

मात्र, लग्नात चर्चा रंगली ती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गप्पांची. मात्र, त्यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही.

Visit : Policenama.com

 

You might also like