CM च्या भेटीमुळे राष्ट्रवादीत हालचालींना वेग ! अजितदादा, जयंत पाटील पोहोचले शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | कोरोना संकटाचा सामना करतानाच गेल्या काही दिवसापासून राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (President Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादी (cp) त हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी (ncp) चे प्रमुख नेते शरद पवार (President Sharad Pawar) यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील दाखल झाले. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि. 26) संध्याकाळी शरद पवारांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. राज्यातील एकूणच कोरोना संसर्गाची परिस्थिती, राजकीय घडामोडी तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून राज्याला कोरोना संसर्गाच्या काळात मिळणारी तोकडी मदत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा

Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज

Health News | जर तुम्हाला लांब आणि मऊ केस हवे असेल तर आजपासून ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

Pune Crime News | ‘बेटर हाफ’ वेबसाईटवरून ओखळ झाल्यानंतर लग्नाच्या अमिषाने 28 वर्षीय तरूणीची 9 लाखांची फसवणूक