Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षांचं अभिनंदन… अजितदादांच्या भाषणाची जोरदार चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी केलेले धुवाँधार फटकाबाजी ऐकून लोकांनाही प्रश्न पडला की, अजित पवार अध्यक्षांचे अभिनंदन करत आहेत की, शालजोडीतले देत आहेत. राहुल नार्वेकर कोण-कोणत्या पक्षातून कसे पुढे गेले, त्यांनी त्या-त्या पक्षाच्या प्रमुखांना कसे आपलेसे केले याचा इतिहासाच अजितदादांनी सांगितला. (Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election)

 

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाची सुरूवात आज रविवारपासून झाली. पहिल्याच दिवशी नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. यात आवाजी पद्धतीने भाजपाचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी 164 मते मिळवत बाजी मारली. यानंतर नार्वेकर यांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्यावर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. (Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election)

 

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत केलेले भाषण सध्या चर्चेत आहे. अजितदादांचे हे भाषण नव्या विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन करणारे आहे की शालजोडीतील टोले लगावणारे आहे, असा प्रश्न ऐकणार्‍यांना पडला होता.

अजित पवार म्हणाले, कोणत्याही पक्षात गेल्यावर नेतृत्त्वाच्या जवळ कसे जायचे याचे कौशल्य राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. शिवसेनेत (Shiv Sena) असताना ते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या जवळचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असताना त्यांनी मला आपलंसं करुन टाकले. त्यानंतर भाजपमध्ये (BJP) गेल्यावर राहुल नार्वेकर हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचे झाले.
आता एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांना आपलंस करुन घ्यावे, नाहीतर तुमचे काही खरे नाही. अजितदादांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

 

अजित पवार यांनी आपल्या भाषणात राहुल नार्वेकर कशाप्रकारे विविध राजकीय पक्षांचा प्रवास केला आहे हेच सभागृहासमोर मांडले.
यावेळी अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांना इतक्या लहान वयात विधानसभेचे अध्यक्ष मिळाल्याच्या मुद्द्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही चिमटे काढले.
भाजपमधील जुन्याजाणते नेते कार्यकर्त्यांसाठी ही आश्चर्यकारक बाब आहे. परंतु, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार,
गिरीश महाजन साहेब
(Sudhir Mungantiwar, Ashish Shelar, Girish Mahajan) जे तुम्हाला कोणाला जमले नाही,
ते आमच्या राहुल नार्वेकरांनी तीन वर्षांमध्ये करुन दाखवले. हे निश्चितपणे कौतुकास्पद आहे, असे अजित पवार म्हणाले.

 

पवार पुढे म्हणाले, या सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो, तेव्हा मुळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त दिसतात.
आमच्या मंडळींना बघून मला भाजपमधील मूळ मंडळींचे वाईट वाटते. आज भाजपमध्ये पदावर असलेली मंडळी आमच्याकडून गेलेली आहेत.
भाजपमधील मूळ मान्यवरांना बाजूला सारून ते पदावर बसले आहेत. पहिली लाईन बघितली तरच हे लक्षात येईल, असे पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar And Vidhansabha Speaker Election | NCP leader ajit pawar speech at vidhansabha speaker election rahul narvekar motion of thanks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’