बाळासाहेबांची सेना ‘कमळी’ला वापरायची पण आत्ताची परिस्थिती वेगळी, अजित पवारांचा शिवसेनेला ‘खोचक’ टोला

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नेहमीच चर्चेत राहतात. दादा कधी आपल्या गावरान शैलीत सरकारचा समाचार घेतात तर कधी आपल्याच कार्यकर्त्याला आवरण्यासाठी दम देतात असाच एक प्रकार नुकताच घटला.

पिंपरी चिंचवड आणि भोसरी मधील एका मेळाव्यात इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तिकिटासाठी शक्तीप्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी केली यामुळे व्यासपीठावर असलेले अजित पवार संतापले आणि जर आता कुणी घोषणाबाजी केली तर तिकिटाचा देणार नाही असा दम दादांनी कार्यकर्त्यांना दिला.

आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मध्यंतरी बातम्या येत होत्या की, अजित दादा शहर वासियांना विसरले. मात्र हे शक्य नाही कारण मी तुम्हाला मरेपर्यंत विसरू शकणार नाही. हा समोर बसलेला कार्यकर्ता जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यत मी कोणाच्याही बापाला घाबरनार नाही असे अजित पवारांनी यावेळी ठणकावून सांगितले.

पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे मतदासंघ आपल्याकडे आलेले आहेत लवकरच त्याच्या तिकीटाची घोषणा होईल मात्र कोणी नाराज व्हायचे नाही. जर या तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून दिले तर अनिधकृत बांधकामावर आकाराला जाणार शास्ती कर येत्या सहा महिन्यात रद्द करिन नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असे अश्वसनाही अजित पवारांनी यावेळी बोलताना दिले.

वंचित आघाडी नसती तर आपले १२ – १३ खासदार वाढले असते. सेना भाजपची युती होईलच कारण सेना बॅकफूटवर आहे. बाळासाहेबांची शिवसेना कमळीला वापरायची मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी असल्याचे पवारांनी यावेळी नमूद केले. तसेच पक्ष बदलणाऱ्यांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले सत्ता आल्यावर ते परत आपल्याकडे येतील पदरात घ्या म्हणतील पण मी त्यांना घेणार नाही.

Visit – policenama.com