Ajit Pawar | अन्यथा महाविकास आघाडीत फूट पडेल, संजय राऊतांच्या या विधानावर अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘जो पर्यंत…’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Swatantryaveer Savarkar) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सावरकरांच्या मुद्यावरुन खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) फूट पडेल असे वक्तव्य केले होते. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. जोपर्यंत राष्ट्रीय नेते शरद पवार (Sharad Pawar), सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आशीर्वाद आहेत. तोपर्यंत महाविकास आघाडीला किंचितही धोका नाही, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये बोलताना सांगितले.

 

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, मला सावरकरांविषयी काहीही बोलायचे नाही. राजकीय नेतेगण, मीडियाने कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे हे ठरवले पाहिजे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात आहेत. अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला पीक विम्याचे पैसे (Crop Insurance Money), शासनाकडून मिळणे गरजेचे आहे. हे सर्व सोडून अनेक वर्षापूर्वी घडून गेलेल्या गोष्टीबद्दल, व्यक्तीचा उल्लेख करुन नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

सध्याच्या सरकारने महाविकास आघाडीच्या आमदारांच्या कामांना स्थगिती दिली आहे. उड्डाणपूल, पूल व अन्य कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. वास्तविक या कामांना विधिमंडळ सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. अशी कामे थांबवणे उचित नाही, याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना प्रत्येक भेटीत सांगितल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी नवीन कामे सुरु करण्याबाबत आमचे दुमत नाही. मात्र मागील विकासाची कामे (Development Work) थांबवण्याचेही काही कारण नाही. सत्ता नेहमी बदलत असते. त्यामुळे अत्ताच्या राज्यकर्त्यांनी कायम आपणच सत्तेत राहणार नाही, हे लक्षात ठेवून विरोधकांना सापत्नभावाची वागणूक देऊ नये, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.

नुकतीच राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची (NCP Star Campaigner) यादी जाहीर झाली आहे.
यामध्ये खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचे नाव नसल्याने ते नराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, स्टार प्रचारकांच्या यादीतून खासदार अमोल कोल्हे यांचे नाव वगळल्याच्या प्रश्नावर काही माहिती नाही.
मी रोज वेगवेगळ्या जिल्ह्याच्या दौऱ्यांवर असतो.
मध्यंतरी यासंबंधी बातम्या आल्यानंतर मी डॉ. कोल्हे यांच्याशी बोललो होतो. आमचे सातत्याने बोलणे होत असते.
मात्र, सध्याच्या बातम्यांबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेऊनच मी बोलेन, असं अजित पवार यांनी म्हटले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | as long as sharad pawar sonia gandhi and uddhav thackeray
have their blessings there is no danger to mahavikas aghadi said ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा