Pune News : अजित पवारांची ‘मन की बात’, ‘…तोपर्यंतच खूर्चीवर राहणार, मी राजकारणात अडकलोय’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आम्ही कधीपर्यंत खूर्चावर, जनता सांगेल तोपर्यंत. जनता म्हणाली घरी बसा की आम्ही चाललो, मात्र सीईओ जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खूर्चावर, शिवाय प्रमोशन होत जात. राजकारणाच्या भानगडीत पडून नका, मी राजकारणात आलोय, अकडलोय. कुठे जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असे म्हणत अजित पवारांनी टोलेबाजी करत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवारांची शाब्दिक फटकेबाजी

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे नवीन माध्यम स्वीकरालं पाहिजे. ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. अद्याप कोरोना गेलेला नाही, त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. माझा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी मी मास्क काढला. नाहीतर तुम्हीच म्हणाल, या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला सांगतोय, असा शब्दात त्यांनी शाब्दिक फटकेबाजी केली.

आनंद आणि पैसा मिळेल असे क्षेत्र निवडा

यावेळी विद्यार्थ्यांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण करीअर निवडताना विचार करा, आपल्या आई वडिलांचा सल्ला घ्या. व्यवसाय करता येईल का ? प्रशासकीय सेवेत येता येईल का ? याचा विचार करा. अभिनेता, कला संगीत, पत्रकार असं वेगवेगळं क्षेत्र निवडू शकता. आनंद आणि पैसा मिळेल असे क्षेत्र निवडा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच कोणत्याही क्षेत्रात जावा, आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करा. मात्र चारित्र्याला डाग पडणार नाही याची काळजी घ्या. एकदा का विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चागंले मित्र निवडा, मित्र बरबाद करायलाच असतात, असे अजित पवार यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांचे टोचले कान

मी पाच वाजता उठलो आणि तासभर व्यायाम केला. सात वाजता एक उद्घाटन केलं. लोक विचारतात हा बाबा झोपला होता का ? काही पुढाऱ्यांचं पोट पुढे आलंय. स्टेजवरची लोकंही सुटायला लागलेत. पण तुम्ही व्यायाम करा, असं मुलांना सांगताना त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.