दहावी पास व्यक्ती महाराष्ट्राची वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री  

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात उचल खाल्ली असून त्यांनी सरकार वर टीका करण्याचा सपाटाच लावला आहे. आज कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत अजित पवार यांनी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षण असणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र चव्हाण शिकलेत दहावी आणि त्यांच्याकडे खाते कोणते दिले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता यातले त्यांना काय समजणार आहे डोमले ? असा सवाल अजित पवार यांनी सरकारला विचारला आहे.

रवींद्र चव्हाण यांच्याकडे राज्याच्या बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचा राज्यमंत्री पदाचा पदभार सोपवण्यात आला असून त्यांचे शिक्षण दहावी पास एवढे आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी दाखल करण्यात आलेल्या विधानसभेच्या उमेदवारी अर्जात पान क्रमांक १६ वर रवींद्र चव्हाण यांचे शिक्षण दहावी पास असे नमूद करण्यात आले आहे.

अजित पवार यांनी आज कल्याणच्या सभेत भाजपच्या नेत्यांचे शिक्षण काढण्याचा प्रयत्न केला असून भाजपच्या मंत्र्यांकडे बोगस डिग्र्या असतात असे म्हणून अजित पवार यांनी विनोद तावडे त्यांच्यावर टीका केली आहे. रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभेचे भाजप आमदार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी मुंबई मध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी मंत्री बनवल्याचे राजकीय जाणकार सांगतात.