Ajit Pawar | राज्यात दंगल घडवून आणण्याचे प्रयत्न, कोल्हापुरातील परिस्थितीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवराज्याभिषेक दिनी (Shiv Rajyabhishek Din) सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आले होते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये काल दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रूप धारण केले. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organizations) पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला (Kolhapur Protest) हिंसक वळन लागल्याने पोलिसांना (Kolhapur Police) लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. कोल्हापुरातील घटनेबाबत विरोधी पक्षनते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात दंगील घडवून आणण्याचे प्रयत्न होत असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.
कोल्हापुरातील परिस्थितीवर अजित पवार यांनी बोलताना, राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न होत आहेत
असे सांगत कायदा हातात घेऊ नका, शांततेनं प्रश्न सोडवा असं आवाहन त्यांनी केलं.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून द्वेष निर्माण केला जातोय का? असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. अजित पवार पुढे म्हणाले, हिंसाचार टाळण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. बंदची हाक दिल्यामुळे शांततेसाठी बैठक घ्यायला हवी होती. कोल्हापुरातील घटनेमागे कोण आहे याचा सरकारने छडा लावावा. तसेच पोलिसांना फ्री हँड द्यायला हवा असेही अजित पवारांनी म्हटले.
कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद
कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी
कोल्हापूर पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा (Internet Service) खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून दूरसंचार कंपन्यांना (Telecom Companies) आदेश देण्यात आल्याची माहिती
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (SP Mahendra Pandit) तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे (Kolhapur Region)
आयजी सुनील फुलारी यांनी दिली. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar)
आणि पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी (IG Sunil Phulari) यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Web Title : Ajit Pawar | Attempts to create riots in the state, Ajit Pawar’s reaction to the situation in Kolhapur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा