Ajit Pawar Birthday | अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत मैफिल व कार्यकर्ता सन्मान पुरस्कार संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar Birthday | विरोधी पक्षनेते  अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Ajit Pawar Birthday)  बालगंधर्व रंगमंदिर (Balagandharva Rangmandir) येथे झालेल्या संगीतांच्या मैफिलीस रसिकांचा चांगला  प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap), प्रवक्ते प्रदीप देशमुख (Spokesperson Pradeep Deshmukh) व सरचिटणीस प्रविण सोनी (General Secretary Pravin Soni) यांनी केले होते.

 

जुन्या हिंदी / मराठी गाण्यांच्या या मैफिलीत तब्बल 5 तास श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांनी आपल्या सुमधुर आवाजात अनेक गाण्यांना उजाळा देत 80-90 च्या दशकातील आठवणी जाग्या केल्या. अतिशय नियोजनबद्ध झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम रसिकांचे सनई चौघडे वाजवून व औक्षण करत स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व प्रेक्षकांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या.

 

राष्ट्रवादी कार्यकर्ता सन्मान पुरस्काराकरीता मिनाक्षी भेगडे, महेश भांगे, ज्योती सूर्यवंशी, शोभा बोडके, उर्मिला शेलार
पाच कार्यकर्त्यांची लकी ड्रॉ द्वारे यांची निवड केली व विजेत्यांना बक्षिसे देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
रात्री 12 वाजता आयुश वेदपाठक या पाचवीच्या विद्यार्थ्याच्या हस्ते केक कापून अजित पवार यांचा वाढदिवस (Ajit Pawar Birthday) साजरा करण्यात आला.
‘राष्ट्रावादी पुन्हा’ या गाण्यावर अनेक प्रेक्षकांनी ताल धरला व मोठ्या उत्साहात व जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला.

 

Web Title :- Ajit Pawar Birthday | Music concert and Worker’s Honor Award held on the occasion of Ajit Pawar’s birthday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Reliance Jio Q1 Results | रिलायन्स जिओने तिमाही लाभात केली 24 टक्के वाढ, जाणून घ्या कंपनीचे नेट प्रॉफिट

 

Pune PMC Election 2022 | 29 जुलैला महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत, इच्छुक पुन्हा गॅसवर 

 

Tata Steel च्या एका शेअरच्या बदल्यात मिळतील 10 शेअर, कंपनीने ठरवली स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट