Ajit Pawar | अजित पवारांची सीबीआय चौकशीची भाजपकडून मागणी; राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) –  मागील काही दिवसापूर्वी भाजप प्रदेश कार्यसमितीकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. यांनतर स्वतः भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या दोघांची चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांची CBI मार्फत चौकशी करण्यासाठीचे पत्र थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना पाठवले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Ajit Pawar | bjp demands ajit pawars cbi inquiry ncp leader navab malik first reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) अजित पवार (Ajit Pawar) व अनिल परब (Anil Parab) यांची CBI चौकशीची मागणी केली आहे.
पण, आम्ही अशा चौकश्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे मलिक (Nawab Malik) म्हणाले, ‘राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चौकशीची मागणी केलीय.
आता भाजप पक्षाचे नेते ठरणार का? कोणाची चौकशी करायची, कुणाला दोषी ठरवायचे.
महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही. आम्ही घाबरत नाही, भाजपचे काही नेते अडचणीत येणार आहे.
म्हणून भाजपकडून अशी मागणी केली जात असल्याचं नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं आहे.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? (Chandrakant Patil)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे.
त्यामुळे या प्रकरणाची CBI मार्फत सखोल चौकशी करावी, अशी प्रदेश भाजपची मागणी असल्याचं या पत्रातून उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच, प्रदेश भाजपच्या 1 कोटी 10 लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे.

Web Title : Ajit Pawar | bjp demands ajit pawars cbi inquiry ncp leader navab malik first reaction

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil । अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र