Homeताज्या बातम्याAjit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले - 'दोघांचा आवडता एकच...

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लवकरात लवकर होईल, हा दोघांचा आवडता शब्द झाला आहे. आता खूपच लवकर करा कारण अधिवेशनात (Session) उत्तर द्यावं लागेल. पालकमंत्री (Guardian Minister) नेमले नाहीत, त्यामुळे जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण (Flag Hoisting) हे पालकमंत्र्याविनाच होणार आहे, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) केली. पुण्यात जिल्हा बँकेच्या बैठकीसाठी अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर जोरदार टीका केली.

 

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, शिवसेनेमध्ये (Shivsena) जे काही झालं ते सामान्य नागरिकांना आणि शिवसैनिकांना आवडलेलं नाही. ज्यांना निवडून आणलं ते टर्म संपेपर्यंत राहतात. पण सेनेचा इतिहास आहे, जे बंडखोरी करुन बाहेर पडतात ते परत कधीच निवडून येत नाही. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांची उदाहरणे आहेत, अशी आठवण त्यांनी बंडखोरांना करुन दिली.

 

ते पुढे म्हणाले, ठराविक उद्योगपतींच्या कुटूंबांचं कर्ज माफ केलं जातंय.
सर्वसामान्यांच्या कर्जाला मात्र पन्नास प्रश्न हे होता कामा नये कठोर कारवाई केली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली आहेत.
मशाल मिरवणूक काढायची आहे आता पालकमंत्री नाहीत असेही अजित पवार म्हणाले.

 

महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) काम सुरु आहे. अधिवेशनात एकत्रित काम करणार आहोत.
नाना पटोलेंनी (Nana Patole) काय बोलायचं हे त्यांनी ठरवावं. त्यांच्या संदर्भात काँग्रेस पक्ष (Congress Party) भूमिका मांडेल.
पण वेगवेगळ्या विचारधारेचे असलो तरी आम्ही एकत्र आहोत.
मजबुतीने सरकार चालवलं आता विरोधातही एकत्र राहू, असे अजित पवारांनी सांगितले.

 

 

Web Title : –  Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News