Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | वाहतुकीचे नियम केवळ सर्वसामान्यांसाठी असतात, व्हीआयपी लोकांना हे नियम नसतात, ते केवळ नियम मोडण्यासाठीच असतात, याचा प्रत्यय आज पुण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा उलट्या दिशेने सुसाट निघाला होता. समस्त पुणेकर हा प्रकार पहात होते, तसेच वाहतूक पोलिसही अंध होऊन निमूटपणे याकडे दुर्लक्ष करताना दिसले.(Ajit Pawar Breaks Traffic Rules In Pune)

उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि शिरुरचे महायुतीचे (Shirur Lok Sabha) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी (Pune Collector Office) कार्यालय येथे आले होते. येथे काही वेळ थांबून ते बाहेर आले व निघताना त्यांचा गाड्यांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला. पोलिसांनी देखील त्यांना अडवले नाही. इतर वाहने थांबलेली असतानाही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा मात्र, सुसाट निघाला होता.

एरव्ही सिग्नलला पांढऱ्या रेषेच्या बाहेर बाईकचे चाक जरी असेल तर कंट्रोल रूममध्ये बसलेले वाहतूक पोलीस संबंधित
वाहन चालकाला फोटोसह चलान पाठवतात. आज या कंट्रोल रूममध्ये बसलेल्या पोलिसांना देखील काहीच दिसले नाही,
आणि रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांनाही अजित पवारांचा उलट्या दिशेने जाणारा ताफा दिसला नाही.

लोकांची वाहने सिग्नलजवळ थांबलेली असताना अजित पवारांचा ताफा मात्र, उलट्या दिशेने सुसाट जात होता.
अधिकाऱ्यांना नियमाने वागा म्हणणाऱ्या अजित पवारांचा ताफाच आज उलट दिशेने निघाला होता,
त्यांना वाहतुकीच्या नियमांचा विसर पडल्याचे दिसले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार