Ajit Pawar | माफी नाही, दिलगिरी नाही, संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षकचं’, अजित पवारांनी ठणकावलं (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या विधानाविरोधात भाजप (BJP) व शिंदे गटाने (Shinde Group) आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षांनी केली आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे अजित पवार म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी आजपर्य़ंत कोणत्याही महापुरुषांबद्दल, महिलांबद्दल कधीही चुकीचं बोललेलो नाही. परंतु या अगोदर जो महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) महामोर्चा काढला होता. त्यावेळी राज्यपालांनी अक्षरशा राष्ट्रपुरुष यांचा अपमान केलेला होता. वेगळ्याप्रकारची वाक्यरचना केली होती, बेताल वक्तव्य केलं होतं. जो शब्दप्रयोग करायला नको होता, तो त्यांनी केला होता. ते सर्व मी त्यावेळी समोर मांडलं होतं, असं अजित पवार म्हणाले.

माझ्या विरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिले

अजित पवार पुढे म्हणाले, मला एक कळत नाही, आता हे मागील दोन दिवस भाजप त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले की तुम्ही अजित पवारांविरोधात आंदोलन करा आणि अजित पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपने विरोधी पक्षनेते पद दिलेलं नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या 53 आमदारांनी हे पद दिले आहे. त्यामुळे या पदावर मला ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्यामध्ये मागणी करण्याचा अधिकार नाही.

भाजपच्या आंदोलनावर पवारांची टीका

मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, की मंत्री, आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांनी मला फोन करुन सांगितलं की, हे आम्हाला आंदोलन करण्यास सांगत आहे आणि अजित पवार चुकीचं बोललं असं सांगत आहेत. परंतु आम्हालाही कळेना तुम्ही नेमकं काय चुकीचे बोलले आहात. परंतु आम्हाला आंदोलनाचा काय पॅटर्न असला पाहिजे, अजित पवारांच्या फोटोला फुली आणि उर्वरित मायना संगळ पाठवून दिलेलं आहे. आम्हाला सांगितलं आहे की, जिथे तुम्ही आंदोलन कराल तिथले फोटो काढून भाजप कार्य़ालयाला पाठून द्या, अशा पद्धतीने ते आंदोलन करायचं असं सांगितलं गेलं, असं म्हणत अजित पवार यांनी भाजपच्या आंदोलनावर टीका केली.

 

त्यांनी वक्तव्य करुन माफी मागितली नाही

आंदोलन करणाऱ्यांच्या मनात आणि त्यांनी सांगितले त्यांना मला विचारायचं आहे, महापुरुषांचा अपमान, चुकीचे शब्द प्रयोग वापरुन मंत्रिमंडळातले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) याचं वक्तव्य वाचलं आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील शिवरायांची उपमा मुख्यमंत्री शिंदेंना दिली होती. प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही शिवरायांच्या जन्मचा नवा जावई शोध लावला होता. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अफजल खानाने शिवरायांचा कोथळा बाहेर काढाला असं विधान केलं होतं. त्यांनी वक्तव्य करुनही माफी मागितली नाही. त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही, असंही अजित पवार म्हणाले.

सात ते आठ जण ‘धर्मवीर’

धर्मवीर उपाधी कोणाला मिळाली हे तुम्ही इंटरनेटवर शोधा. सात ते आठ जण धर्मवीर आहेत.
काहींचे तर चित्रपट निघाले आहेत. आता तर धर्मवीर पार्ट 2 येत आहे. स्वराज्यरक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. त्यामुळे स्वराज्यरक्षक एकच असून दुसरा कोणी होऊ शकत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

मी चूक केली असं वाटत नाही

मी खूप मोठी चूक केली असा मला वाटत नाही. मी भाषण केलं तेव्हा आक्षेप घेतला नाही.
दोन दिवसानंतर ठरलं हा एक ग्रुप आहे जे अस डोकं लावतात. ही क्लुप्ती काढणारा मास्टर माइंड तिथे नव्हता.
त्यानंतर आंदोलन करण्यास सुरुवात झाल्याचे अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या आपल्या मित्र पक्षाला आणावे.
आम्ही वंचितला विरोध केला नाही. सगळ्या मित्र पक्षाला आणावं.
एकत्र तीन पक्ष बसून जागा वाटप करताना त्यांच्या मित्र पक्षाला त्यांच्या जागा देतील, असेही अजित पवार म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | chhatrapati sambhaji maharaj will be called swarajyakshak say ajit pawar