Ajit Pawar Clean Chit | अजित पवारांना ‘कचाकचा’ क्लीनचीट, काल सुनेत्रा पवारांना तर आज दादांना दिलासा, निवडणूक आयोगाने म्हटले, ‘त्या’ वक्तव्यात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar Clean Chit | बारामतीच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai EoW) कालच क्लीनचीट दिली होती. आज अजित पवारांना अचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने (Election Commission Maharashtra) क्लीनचीट दिली आहे. अजित पवारांचे कचाकचा हे वक्तव्य राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते. मात्र, आता त्यांना क्लीनचीट मिळाली आहे. अशाप्रकारे कचाकचा क्लीनचीट मिळत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.(Ajit Pawar Clean Chit)

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi IAS) यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase IAS) यांना सादर केला आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाला देखील त्याची एक प्रत पाठवण्यात आली आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचे नाव नव्हते, असे म्हणत क्लीनचीट देण्यात आली आहे.

इंदापूरच्या सभेत (Indapur Sabha) अजित पवार यांनी म्हटले होते की, आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकासकामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ. पण जस आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचाकचा बटण दाबा. म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटंल. नाहीतर माझा हात आखडता येईल. या वक्तव्याला शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

यानंतर कविता द्विवेदी यांनी अजित पवारांच्या वक्तव्याची चौकशी केली.
प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव त्यांच्याकडून
घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही असे कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress News | ‘कट-कारस्थानांचा डीएनए’ हा भाजप’चा.. काँग्रेसचा नव्हे ..! ‘वारसा हक्क संपत्तीकर लावण्याचे मनसुबे २०१९साली भाजपचेच..!! – राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी

Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार