ज्याचा १४५ चा आकडा तोच ‘दावेदार’ : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जो पक्ष १४५ चा आकडा गाठेल, त्याचीच मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी असेल अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेच्या भूमिकेवर भाष्य केले. शनिवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुजन सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला. ‘अंधारात अनेक जण वर्षावर येऊन भेटत असतात’, असे म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ती सवयच आहे. अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नसते, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली.

आदित्य ठाकरे यांच्या दावेदारीच्या बातम्यांबाबत बोलताना मात्र अजित पवार यांनी कुणाला दावेदार म्हणून समोर आणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि आदित्य ठाकरे शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे स्वाभाविक त्यांना दावेदार म्हणून समोर आणले जात आहे, हा शिवसेनेचा प्रश्न आहे. पण१४५ चा आकडा जो पक्ष गाठेल त्याचीच दावेदारी असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like