विधानसभा 2019 : अजित पवार बारामतीतूनच लढणार, ‘यांनी’ केली उमेदवारीची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधूनच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे समजत आहे. माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदारकीच्या राजीनामा देण्याबाबतही खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबात कोणताही गृहकलह नाही असेही सांगितले.

अजित पवार म्हणाले, “गेल्या 30 वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या बारामती मतदारसंघातूनच मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. जर आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी मला उमेदवारी दिली तर मी बारामतीमधूनच निवडणुकीच्या मैदानात असेल.” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पवारांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, “अजित दादांशिवाय बारामतीला आणि आम्हालाही पर्याय नाही.” जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना बारामतीचे उमेदवार घोषित केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार हे बारामतीमधून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असतील असं म्हणणं वावग ठरणार नाही.

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे काही गोष्टींचा खुलासा केला आहे. आपल्या राजीनाम्याचा खुलासा करताना अजित पवार म्हणाले, ” “सगळ्यांना न सांगता राजीनामा देऊन मी सर्वांना दुखावलं त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. माझ्या राजीनाम्यामुळे माझे हितचिंतक भावूक झाले होते. विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला. माझा राजीनामा देणे चूक आहे किंवा नाही माहिती नाही. त्याच्या खोलात मी जाणार नाही. शरद पवार कोणत्याही सहकारी संस्थेचे संचालक नाहीत. शिखर बँकेशी पवारांचा काहीही संबंध नाही. ईडीच्या प्रेसनोटमध्ये पवारांचं नाव होतं. पवारांचं नाव पाहून मी अस्वस्थ झालो. आपल्यामुळे साहेबांना या वयात बदनामी सहन करावी लागते. यामुळे मी कोणालाही न सांगता मी राजीनामा दिला. फोन बंद करून मी मुंबईतच माझ्या नातेवाईकाच्या घरी होतो.

Visit : Policenama.com