भीषण पुरातही ‘राजकारण’, ‘या’ नेत्याने सुनावले ‘खडे बोल’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – महापूराने कृष्णा, कोयना, वारणेला आलेल्या पावसाने जनतेचे चांगलेच हाल झाले आहेत. अशातही मानवतेचा धडा देण्यासाठी नागरिक सरसावले असताना राजकीय ‘आखाड्या’त मात्र एकमेकांची उणीदुणी काढण्याचे राजकारण पेटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नदीला संरक्षक भिंत न घातल्याने हा पूर आल्याचा दावा करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोषी धरणाऱ्या सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे यांना पवारांनीच साताऱ्यात येऊन फटकारले आहे. ‘लेटलतीफ ‘ अशा शब्दात तोफ डागताना अजितदादा पवार यांनी भीषण पुरातही शिवतारे राजकारण करीत असून एकप्रकारे पुरग्रस्तांच्या भावनांशी खेळ करीत आहेत असे खडे बोल पत्रकार परिषद घेऊन सुनावले आहेत. इतकेच नाही तर पालकमंत्री एकतर पूर ओसरल्यानंतर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पुराच्या संदर्भातील उपाययोजनांवर बोलण्याऐवजी मागची उणीदुणी काढून पालकमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

कराड येथील कृष्णा-कोयना नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्या संदर्भातील प्रस्तावास आघाडी सरकारमधील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केल्यामुळे भिंतीचे काम रखडले. त्यामुळेच कराडला पुराचा फटका बसल्याचे वक्तव्य जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कराडमध्ये केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, पालकमंत्री एकतर पूर ओसरल्यानंतर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी पुराच्या संदर्भातील उपाययोजनांवर बोलण्याऐवजी मागची उणीदुणी काढून पालकमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

कृष्णा-कोयना नदीकाठी संपूर्ण संरक्षक भिंत उभारण्याच्या प्रस्तावास आघाडी सरकारच्या काळामध्ये मान्यता मिळाली होती. परंतू, संरक्षक भिंत सिमेंटची उभारायची, का जाळीची दगडी भिंत उभारायची याबाबत विचार चालला होता. याठिकाणी सिमेंटची भिंत उभारली तर कायमस्वरुपी येथील पुराचा धोका कमी करण्यासंदर्भातील उपाययोजना करता आल्या असत्या. मात्र, जाळीची दगडी भिंत उभी केली असती तर काही कारणाने भिंतीच्या जाळ्या तुटून नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे पहायला मिळतात. त्यामुळेच भिंती संदर्भातील विषय रखडला होता. मात्र, पालकमंत्री शिवतारेंनी जिल्ह्याच्या पूर परिस्थिती संदर्भात उपाययोजना करण्याचे सोडून पाठीमागील उणीदुणी बाहेर काढून भीषण पुरातही राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला.

आरोग्यविषयक वृत्त