‘या’ कारणामुळं मंत्री शिवतारेंचा 30 हजार 820 मतांनी पराभव झाला : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विजय शिवतारे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते आमदार म्हणून निवडून देखील आले. मंत्री देखील झाले. मात्र, शिवसेनेत गेल्यानंतर शिवतारेंनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात वेळावेळी वेगळया प्रकारची वक्तव्ये केली होती. जी वक्तव्ये कोणीही दुसरी व्यक्ती करू शकत नाही. अशा प्रकारचे वक्तव्य, घमेंड आणि मस्तवालपणा या कारणामुळं शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. ते एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत होते. त्यावेळी अजित पवारांनी शिवतारेंच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली होती. अनेकवेळा अजित पवार यांनी शिवतारेंना लक्ष्य केलं होतं तर शिवतारे वेगवेगळया प्रकारची वक्तव्ये करून शरद पवारांवर निशाणा साधत होते. शेवटी अजित पवारांनी थेट आमदार म्हणून कसा निवडून येतो तेच पाहतो अशी जाहिररित्या घोषणाच केली होती. शिवतारे याच्या विरोधात आघाडीचे संजय जगताप हे तब्बल 30 हजार 820 मतांनी निवडून आले. काँग्रेसच्या संजय जगताप यांचा प्रचार करताना अजित पवारांची सभा झाली. त्यावेळी देखील अजित पवारांनी शिवतारेंना लक्ष्य केलं होते. निकालानंतर शिवतारेंचा मोठया माताधिक्क्यानं पराभव झाल्याचं समोर आलं आणि अजित पवारांनी जाहिररित्या केलेलं वक्तव्य खरं ठरलं.

Visit : Policenama.com