Ajit Pawar | दसरा मेळावे झाले आता सर्वसामान्य जनतेने जो तो काही निर्णय घ्यावा – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या (Shivsena) दोन्हीही गटांनी त्यांचे विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्या पार्टीच्या अंतर्गत विषय असल्यामुळे त्यांना ऐकण्याचा सगळ्यांना कुतुहल होतं. दोन्हीकडे गर्दी होती हे मी पण पाहिले आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना देखील मी टीव्हीवर पाहिल्या. कारण आम्ही अडीच वर्षे सरकार मध्ये काम केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर त्यांचे विचार होते व जूनमध्ये राजकीय बदल करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाले आहेत. त्यांचेही विचार होते. आता शिवसैनिकांनी (Shiv Sainik) विचार करून जो तो निर्णय घ्यावा असेही विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले आहे. ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या (NCP) अजिंड्यावर चालते यात काही तथ्य नाही तो राजकीय आरोप असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात (Cabinet) काम करीत असताना ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे. याच्याकडून मी कधी ऐकले नाही की झेंडा शिवसेनेचा आहे अजिंठा राष्ट्रवादीचा आहे, कारण तिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) होती. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळे पक्षाला घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. 2004 व 2009 ला देखील आघाडी होती. त्यामुळे असे काही नसते. आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला. तो सगळ्यांचा होता. कोरोनाचा मुकाबला करताना सर्वांच्याच बाबतीत तो निर्णय घेतला. इतरही निर्णय सर्वांसाठीच घेतलेले आहेत. काल जे काही वक्तव्य त्यांनी केले ते राजकीय हेतूने होते असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले.

वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गेल्याने दोन लाख तरुणांच्या नोकऱ्या गेल्याचा रोष झाकण्यासाठी हा प्रकल्प टक्केवारी मागितली म्हणून गेला असा आरोप केला आहे. यावर अजित पवार म्हणाले, हा आरोप धांदांत खोटा आहे . याबद्दल मी मागेही मीडियाला दाखवले होते. याबाबत कोणते निर्णय घ्यायचे याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीचे सर्व टिपणे आपल्याकडे आहेत. जुलैमध्ये मुख्यमंत्री हाय पावर कमिटीची बैठक घेतात त्यामध्ये निर्णय घेतात. आता वेदांता हा प्रकल्प गेला आहे. दोन लाख तरुणांचा रोजगार गेल्याचा रोष त्यांच्यावर येईल व ते झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करीत आहेत. तुम्हीच मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प येतोय म्हणून सांगता आणि परत तथ्य नसलेले आरोप करता हे योग्य नाही असे अजित पवार म्हणाले.

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा

अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri East Bypoll Election) होत आहे त्याला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला
असे विचारल्यानंतर राष्ट्रवादी देखील जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांना वेठीस धरून दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) एसटीसाठी दहा कोटी भरून बसेस
दसरा मेळाव्याला गेल्याने प्रवाशांचे हाल झाले, असे अजित पवार म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | Dasara Melava 2022 are over, now the common people should decide whatever – Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा