Ajit Pawar | अजित पवारांची चौफेर फटकेबाजी ! राज ठाकरे यांच्यासह राणा दाम्पत्य, गोपीचंद पडळकरांचा घेतला ‘समाचार’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – सातारा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चौफेर फटकेबाजी करत राज ठाकरे (Raj Thackeray), राणा दाम्पत्य (Rana Couple) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचा खरपूस समाचार घेतला. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत (Ayodhya Tour) बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आता हे अयोध्येला चालले आहेत. पण यांनी आधी युपी-बिहारच्या (UP-Bihar) लोकांना मारुन काय साध्य केलं. भोंगे या अगोदर दिसले नाहीत का? यांच्या या भूमिकेमुळे साई मंदिरातील काकड आरती बंद झाली, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

 

साताऱ्यातील वाढे गावात विविध विकास कामांचे उद्घाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), खासदार श्रीनीवास पाटील (MP Srinivas Patil), आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde), आमदार मकरंद पाटील (MLA Makrand Patil) उपस्थीत होते.

 

राणा दाम्पत्याला टोला

अजित पवार म्हणाले, काहींनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणायची आहे. काय नडलं आहे. तुझ्या घरासमोर म्हण ना. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर ते निवडून आले आणि आता त्यांच्या घरासमोर ड्रामा करताय, असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याला सणसणीत टोला लगावला.

 

एका पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त झालं

मागे विधानसभेत माझ्या विरोधात एक पठ्या आणला होता. पण बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त करुन घरी पाठवले, असे म्हणत अजित पवारांनी भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला.

 

बघू तुमच्यात किती धमक

शरद पवार (Sharad Pawar) यांना याबद्दल माहिती आहे. मात्र लहान मानसं टीका करतात.
कारखाने चालवायला घ्या मग बघू तुमच्यात किती धमक आहे.
मकरंद पाटील यांनी कारखाना चालवायला घेतलाय.
नीट चालवा नाही तर माझ्या सारखी केस जातील,
असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

Web Title :- Ajit Pawar | DCM And NCP Leader Ajit Pawar On MNS Chief Raj Thackeray, MP Navneet Rana, MLA Ravi Rana And BJP MLA Gopichand Padalkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा