Ajit Pawar | दुधात भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करा, अजित पवारांची विधानसभेत मागणी (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दूध भेसळीची (Adulterated Milk) समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे साम्राज्य पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्चा-बच्चांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. तसेच दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर (Milk Powder) करुन एक्सपोर्ट करण्याची परवानगी देण्याची मागणीही अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी केली.
राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं मोठं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ pic.twitter.com/4Oyf3fUS1x
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 17, 2023
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. परंतु दूध व्यवसायामध्ये काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचे मोठे साम्राज्य पसरले असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.
राज्यात दूध भेसळीची समस्या गंभीर बनली आहे. दूध भेसळ करुन लहानग्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार
सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा (Death Penalty)
करण्याचा कायदा प्रस्तावित होता. परंतु राष्ट्रपतींनी या कायद्याला परवानगी दिली नाही, त्यामुळे हा कायदा झाला
नाही. मात्र दूध भेसळ ही अत्यंत गंभीर समस्या आहे. दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
Web Title :- Ajit Pawar | death penalty should be provided for those who adulterate milk says ncp leader ajit pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Paytm News Features | पेटीएम वर ‘हे’ फीचर एक्टिवेट करा आणि मिळावा 100 रुपये कैशबैक