Ajit Pawar | पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे (Covid Infection) प्रमाणात नियंत्रणात येत असल्याने शिशू वर्गातील (Infant Class) मुलांचे शिक्षण सुरू करण्यात यावे आणि जम्बो कोविड रुग्णालय (Jumbo Covid Hospital) येत्या 28 फेब्रुवारीनंतर बंद करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन (Pune District Covid Management Review Meeting) आढावा बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. यावेळी जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे (Nirmala Pansare), विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) उपस्थित होते.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, जम्बो कोविड रुग्णालय बंद केल्यानंतर तेथील परिसर पूर्ववत करण्यात यावा. रुग्णालयातील साहित्य पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) आणि ग्रामीण क्षेत्रात उपयोगात आणले जावे. कोविड संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत केंद्र शासनाच्या (Central Government) सूचनेनुसार नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. उद्यान (Garden) आणि दुकानांच्या (Shop) वेळा पूर्वीप्रमाणे करण्यात याव्या. ग्रामीण भागात (Rural Areas) 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्याचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत सौरभ राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात गेल्या 7 दिवसात नवीन रुग्णांच्या संख्येत 51 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणात 85 लाखाने, तर 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणात 49 हजाराने वाढ झाली. जिल्ह्याने 1 कोटी 72 लक्ष लसीकरणाचा (Vaccination) टप्पा ओलांडला आहे. 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या 58 टक्के व्यक्तींना लशीची वर्धक मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते (MLA Dilip Mohite), चेतन तुपे
(MLA Chetan Tupe), सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre),
सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil), पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), सह पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे (Joint CP Dr. Ravindra Shisve), मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Pune ZP CEO Ayush Prasad), जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

Web Title :- Ajit Pawar | Decision to close Jumbo Covid Hospital in Pune Ajit Pawar

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता

Crime News | पती-पत्नीच्या भांडणाचा शेवट क्रूर; जिलेटीनच्या स्फोटाने उडाल्या शरीराच्या चिंधड्या

Janhavi Kapoor Latest Hot Look | जान्हवी कपूरनं रिवीलिंग ड्रेस घालून केला कहर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ