Ajit Pawar | संजय राऊतांचा संतप्त सवाल, म्हणाले – ‘अटक आरोपीच्या पत्रावर अजितदादांची CBI चौकशी कशी काय होऊ शकते?’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) आणि शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या सीबीआय (CBI) चौकशीचा ठराव मांडण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. याच मुद्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा आणि त्यासाठी आधार काय? तर अटकेत असलेल्या अधिका-याच्या पत्र. आरोपी म्हणून अटकेत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्राच्या आधारावर सीबीआय चौकशीची मागणी कशी काय केली जाऊ शकते असा संतप्त सवाल राऊतांनी केला आहे.

BJP MLA | भाजप आमदाराकडून अधिकारी पत्नीचा छळ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले आहे की, अविनाश भोसले यांची मालमत्ता ईडीकडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय? कारवाई सरळ मार्गाने व्हावी.

Ajit Pawar demand for cbi inquiry is bjps plan b say sanjay raut in saamana rokhthok

पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. दमानियांचे म्हणणे असे, भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. भोसलेंची संपत्ती जप्त करण्याची कारवाई म्हणजे भाजप किंवा केंद्राकडून ईडीला मिळालेला आदेश आहे. सीबीआय आणि ईडी या दोन्ही यंत्रणांचे वापर राजकीय कारणासांसाठी होत आहे. दमानिया यांनी पुढे म्हटले आहे की, सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत प्लॅन एप्रमाणे बोलणी सुरू असतील तर प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे किळसवाणे राजकारण असून कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळालीच पाहिजे हे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार प्रताप सरनाईकांच्या मागे ईडीचे तपास अधिकारी हात धुऊन लागले. सरनाईक व त्यांच्या
कुटुंबीयांना या सर्व प्रकरणात मनस्ताप सुरू आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
सरनाईकांना सुरुवातीला ईडीचे समन्स आले तेव्हा भाजप व ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन
असे त्यांनी सांगितले. अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक असे
हतबल का झाले? आमदार सरनाईकांचा त्रागा मुख्यमंत्र्यांना असे टोकाचे पत्र लिहिण्यापर्यंत का गेला? माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियांचाही छळ सुरू सुरु असून तो थांबवा असे त्यांचे म्हणणे आहे.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar demand for cbi inquiry is bjps plan b say sanjay raut in saamana rokhthok

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update