मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांची फिरकी घेतली आहे. साखर कारखाने, सहकारी बॅंकेच्या मुद्यावरुन प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली होती. यावरुनच आता अजित पवार यांनी ”दरेकर साहब को गुस्सा क्यू आता है,” अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली आहे.
प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या मुद्द्यावरुन भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचा उल्लेख न करता यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ”यापूर्वी नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांना काम करताना पाहिले आहे. मात्र दरेकरांच्या संतापाचं कारण समजलं नाही. ‘त्यालाही काही कारणं असू शकतात. ती त्यांनाच माहिती आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रविण दरेकर यांनी सभागृहात महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत.
साखर कारखान्यांच्या विक्रीतही भ्रष्टाचार झाल्याचा घणाघात प्रविण दरेकर यांनी केला आहे. यालाच अजित पवार यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे.
Web Title :- Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar criticism on pravin darekar allegations of corruption political
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update