Ajit Pawar | प्रांत अधिकारी 2% कमिशन घेतात, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी कपाळाला लावला हात अन्…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बारामती दौऱ्यावर असताना काटेवाडी गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित नागरिकांनी अजित पवारांना (Ajit Pawar) वेगवेगळ्या समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी आपला जनता दरबार (Janata Darbar) सुरु केला. कार्यक्रमात एका नागरिकाने जागेच्या मोजणीवरुन सुरु असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्याने समोरील व्यक्ती ऐकत नसल्याचे सांगितल्यावर अजित पवारांचा पारा वाढल्याचे पाहायला मिळाले. या तक्रारीनंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डीवायएसपी (DySP) यांना आदेश दिला, यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतो का ते पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला अशा कडक सूचना त्यांनी दिल्या.

 

प्रांत अधिकारी दोन टक्के कमिशन घेतात
कार्यक्रमामध्ये एका नागरिकाने संत तुकाराम महाराज पालखी मार्गात (Sant Tukaram Maharaj Palkhi Marg) घर गेलं आहे. मात्र त्याचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार केली. यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे (Dadasaheb Kamble) यांना अजित पवार (Ajit Pawar) सूचना देत होते. त्याचवेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गातील नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन (Commission) घेत असल्याची तक्रार केली. भर सभेत अशा प्रकारची तक्रार केल्याने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर अजित पवार यांनी मात्र, कपाळाला हात लावत आश्चर्य व्यक्त केले. त्याचवेळी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील (PA Hanumant Patil) यांना संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या.

अजित पवारांनी सांगितला चोरीचा किस्सा
कार्यक्रमात अजित पवार यांनी त्यांच्या घरात झालेल्या चोरीचा (Theft) किस्सा सांगितला.
आई म्हणाली होती, कुठल्या मुडद्यानं कुणाचा टीव्ही आणून टाकला आहे काय माहिती ? त्यावर आई हा आपल्याच घरातील टीव्ही आहे, आपल्याच घरात चोरी झाली होती, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar instructed to dysp at meeting in baramati on issue of farmers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा