Ajit Pawar | राज्यातील ‘कोरोना’ संकटाबाबत अजित पवार म्हणाले – ‘राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना बाधितांची संख्या (Corona Virus In Maharashtra) पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य (Important Statement) केले आहे. काही महिन्यापूर्वी राज्यातील कोरोना आटोक्यात आला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण (Corona Patient) वाढताना पहायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

 

पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर (Police Ground Shivajinagar) महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din) निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने (State Government) निर्बंध हटवले.
परंतु त्यानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याची चिंता वाढली आहे.
यावर अजित पवार यांना राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली तर पुन्हा निर्बंध (Restrictions) लागू केले जाणार का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले.

अजित पवार म्हणाले, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) याबाबत चर्चा झाली.
पुन्हा मास्क (Mask) वापरण्यासाठी सांगायचं की नाही यावर चर्चा झाली.
सद्यपरिस्थितीमध्ये लोकांना आवाहन केलं असून मास्क वापरणे हे ऐच्छिकच ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तसेच राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढली तर निर्बंध लागू शकतात तसे टास्क फोर्सशी (Task Force) बोलून निर्णय घेऊ असे महत्त्वाचे विधान अजित पवार यांनी यावेळी केले.
टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर काही निर्बंध लागू करु शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचे संकट कमी झालं असले तरी अद्याप ते संपलेलं नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar made important comment on background increasing number corona patients in state

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा