Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांची जवळीक असल्याचा राजकीय चर्चा सुरु आहेत. मात्र असे असतानाच पवार यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी, असा प्रस्ताव भाजपच्या (bjp meeting) प्रदेश कार्यकारिणीत मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar should be cbi inquiry bjp meeting today in mumbai

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha reservation) रद्द केल्यानंतर ओबीसींच राजकीय आरक्षणही OBC reservation स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी तसेच राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi government) आणखी आक्रमकपणे भूमिका मांडण्याबाबत चर्चा होणार आहे. बैठकीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार (Ajit pawar) आणि अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे (Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Praveen Darekar, Girish Mahajan, Ashish Shelar, Pankaja Munde) यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि राज्यभरातील प्रमुख 1400 कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत. राज्यात कोरोनाचे संकट असल्याने प्रत्येक जिल्ह्यातून ऑनलाइन माध्यमातून भाजपचे कार्यकर्ते प्रदेश कार्यकारणीला उपस्थित राहणार आहेत.

Web Title :-  Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar should be cbi inquiry bjp meeting today in mumbai

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास