Ajit Pawar | ‘पन्नाशीत राज्यमंत्रिपदावर खेळत बसलेत’; काँग्रेस नेते सतेज पाटलांना अजितदादांची कोपरखळी

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलताना काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोपरखळी मारली आहे. सतेज पाटील यांना त्यांचे वय विचारले ते म्हणाले आता पन्नाशीच्या आसपास आहे. अजूनही मला कळत नाही की, पन्नाशीला पोहचलेत तरी राज्यमंत्रीच काँग्रेस ठेवते, एवढ्यात राज्यमंत्री पदापर्यंत खेळत बसलेत, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी पवार हे आकुर्डी येथील डॉ. डी.वाय.पाटील ज्ञानशांती स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना पाहतो की आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आहे तरूण व्यक्तीमत्व आहे. मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यांच्यामध्ये धाडस काही कल्पना आणि व्हिजन आहे. तर, नवीन पिढीला पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आम्ही 40 वर्षाचेही नव्हतो त्यावेळी जयंत पाटील, आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील आम्हा सगळ्यांना कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) पद दिलं. त्यामुळे आम्हालाही वाटायचे की आपल्याकडून काही तरी चांगले झाले पाहिजे. मग ते पुणे शहर असो वा पिंपरी-चिंचवड शहर असो. ग्रामीण भाग असो त्यामध्ये आम्ही सर्वांनी हिरीरिने काम करण्याचा प्रयत्न केला. असं अजित पवार म्हणाले.
–
पुढे अजित पवार म्हणाले, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. दोन्ही ठिकाणी मी काम केले आहे. या शहरानेच मला नेमून दिले. त्यामुळे मला माहिती आहे एखाद्या राज्यमंत्र्यांनी कितीही मनात आणले तरी जोपर्यंत त्याला कॅबिनेट मंत्री किंवा वरिष्ठ मंत्री करत नाही, तोपर्यंत त्यांना त्यांच्या मनात ज्या गोष्टी करायच्या असतात त्या राबवायला त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. असं देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.
Web Titel :- Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar take jibe on minister satej patil
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Captain Amarinder Singh Resigns | पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
Raid On Dance Bar | डोंबिवली पूर्वमध्ये नंगा नाच सुरूच; बारवर छापा; 41 जणांना केली अटक