Ajit Pawar | होय, अजित पवारांबाबतचा ‘तो’ बार फुसका ! उपमुख्यमंत्र्यांना ना इन्कम टॅक्सची नोटीस, ना संपत्तीवर ‘टाच’; जाणून घ्या प्रकरण

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने (Income Tax Department) टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार (Ajit Pawar) यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील (Adv Prashant Patil) यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील  म्हणाले की, अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर (property) टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण (Explanation) मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल.

 

प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल,
असंही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये,
असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | deputy chief minister and ncp leader ajit pawar has nothing to do with the action of income tax department adv prashant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

By-Election Results | देशात पोटनिवडणुकीचा संग्राम, जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणी किती जागा जिंकल्या?

Modi Government | DA मध्ये पुन्हा झाली वाढ ! काही सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात करण्यात आली 12 टक्केपर्यंत वाढ

Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके